तुझे हसणे
एक आठवण
तुझे जाणे
एक आठवण
तुला स्मरणे
एक आठवण
तुला गमावणे
एक आठवण
आता फक्त सरण
आणि सोबत मरण
ही तुझ्यासाठी साठवण
मी, मी एक आठवण ......
प्र......साद जोशी
पुणे
10.11.2009
स्वातंत्र्य म्हणजे सदुपयोग
स्वातंत्र्य म्हणजे निराकरण
स्वातंत्र्य म्हणजे विषादयोग
स्वातंत्र्य म्हणजे उदाहरण
स्वातंत्र्य म्हणजे स्वत:ला जाणणे
स्वातंत्र्य म्हणजे सर्वांना जपणे !
प्र....साद
पुणे
१५.०८.२००९
शिकवा कभी न् करना
गैर तो गैर होते है ,
रुसवाई अगर है खुदसे
साथ तुम्हारे खु़दा तो है !
मी हटायचे की हट्टाने रेटायचे
प्रश्न तसाच राहतो
भीड़ चेपायची की भीक घालायची
प्रश्न तसाच राहतो
मीपण जपायचं की माझं स्वत्व
प्रश्न तसाच राहतो
कुढत जगायचं की जगवायचं अस्तित्व
प्रश्न तसाच राहतो
अभिमान जपायचा की स्वाभिमान
प्रश्न तसाच राहतो
मोडून वाकायचं की वाकून मोडायचं
प्रश्न तसाच राहतो
पेटून उठायचं की कुणीतरी पेटायचं
प्रश्न तसाच राहतो
झोकुन द्यायचं की वाकून पहायचं
प्रश्न तसाच राहतो
आपणच आपलेपण सिद्ध करायचे
विस्तव आला तरी स्वत्व आता जपायचे
शिवबा नाही होता आले हे तर चालायचेच
नंगी तलवार उचलता येते एवढे तरी करायचे
मग प्रश्न कधी प्रश्न उरणार नाहीत
उत्तरे कुणाकडे मागावी लागणार नाहीत
आता फक्त ताठ कणा अन् मानानं जगायचं
पाठीवरचा वार छातीवर घ्यायला फक्त शिकायचं
प्र.........साद जोशी
पुणे
०५.०७.२००९
आठवणी मेणबत्ती सारख्या
हातात घेवून फिरत रहातो
उजेड जगाला देतो
चटके हाताला घेतो
हीच साठवण आहे
तुझ्या आठवाची
जगणे जगत रहातो
मरण पेलत जगतो
उपयोग नाही कशाचाच
सर्व काही व्यर्थ आहे
जखम भाळी घेवूनच
अश्वत्थामा अमर आहे
प्र....साद जोशी
पुणे
०४.०७.२००९
जीव गुंतला त्या माळलेल्या गजरयावरती
गुंफून गेले श्वास जणू तो मोगरा होता
थाम्बुन गेलो पुढे न सरलो कणभर भीती
सूर उमटले ओठांवरती
तीही थबकली किंचित वळली कोपरयावरती
पाहिले जेव्हा तिने फिरुनी , एकच तो क्षण होता
उमगले ना श्वास बिलगला , वेडा होता
सूर उमटले ओठांवरती
कधीच ना मी कबुली दिली स्वत:शीच पण
जाणवते आजही मला , मी तो क्षण जिंकला होता
माझाच माझ्या जिंकण्यावर विश्वास नव्हता
अन् ... सूर उमटले ओठांवरती
प्र...साद जोशी
पुणे
१३.०६.२००९
1)
रंगुनी रंगात सगळ्या , रंग मुक्त केले बंद मी ,
तू जरी नसलास सोबती , स्पर्श केले बद्ध मी !
मी तशी कुणीच नव्हते , कधी कुणाची ,
फक्त आहे जीवनी या , मुक्तीसाठी लुब्ध मी !
हा स्वर आला अन् तो क्षण सरला एवढे उरले जरी ,
गुंजन असता मुक्तीचे , काहुर कायम असे उरी !
2)
त्या गहिरया रंगांच्या संगतीने संगतीचे रंग गहिरे झाले ,
पावसात नाह्ताना बंध सैल जाहले ,
एक एक अश्रु आता रंग होऊ लागला ,
शब्द शब्द रंग म्हणुनी कागदी उमटू लागला !!!
तुझे मन तर निर्मळ ,
जणू वाहत्या पाण्याची झूळझूळ ,
कां खड्कानी होतेस अस्वस्थ ?
रहा त्या खडकावर ध्यानस्थ !