चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Saturday, August 22, 2009

जर तसे असेल तर मी खरे सांगू कां अन् काय ?

या चौकोनी कोनात मी कितवा कोण ?
कां हा चौकोन नाहीयेच मुळी,
त्रिकोणाचा एक कोंन आहे मी ?
जर तसे असेल तर मी खरे सांगू कां अन् काय ?

जगतोय जगतोय म्हणताहेत सगळे
श्वास सुद्धा मीच घेतो आहे
जगण्याला या काही अर्थ आहे कां ?
जर तसे असेल तर मी खरे सांगू कां अन् काय ?

मी मी म्हणताना माझा मी कधी उरलोच नव्हतो
तुला तुझा मी कधी वाटलोच नाही
या जगण्याचे गमक कसे शोधू मी ?
जर तसे असेल तर मी खरे सांगू कां अन् काय ?

राख होवुनी उडालो जेव्हा, तेव्हा डोळे तुझे चुरचुरले
डोळ्यात काही गेले म्हणुनी, की लोकांसमोर तसे करावे लागले
या सगळ्या गोष्टींचा मी अर्थ काढू तरी काय ?
जर तसे असेल तर मी खरे सांगू कां अन् काय ?

आता त्रिकोण उरला नाही
श्वास सुद्धा मी घेतच नाही
माझ्यासाठी लिहायला दोन रेषा ठेवून जातोय
या पलिकडे मी आता खरे सांगू तरी काय ?

प्र.....साद जोशी
पुणे
२३.०८.२००९

No comments:

Post a Comment