मन कुणास उमगावे, कसे सांगावे उमगत नाही
असतील , आहेत कित्येक सोबत, परी सोबतीला कुणी नाही
कुणा समजावे कसे सांगावे , उमगत नाही
असतील , आहेत कित्येक सोबत, परी सोबतीला कुणी नाही
मी व्यर्थ आहे, की हे जगणे व्यर्थ आहे, उमगत नाही
प्रत्येकाच्या इछेला मान द्यावा की मान झुकवावी उमगत नाही
स्वत्व सांगते वाग आपल्या इछेप्रमाणे, काय करावे उमगत नाही
असतील , आहेत कित्येक सोबत, परी सोबतीला कुणी नाही
मी जाळत जावे, की जळतच रहावे उमगत नाही
मी माझ्या मरणाला कवेत घ्यावे की चितेत ह्या झोकुन द्यावे उमगत नाही
चित्त म्हणावे की अवचित म्हणावे, काय करावे उमगत नाही
असतील , आहेत कित्येक सोबत, परी सोबतीला कुणी नाही
मी आहे हा असाच आहे, कां कुणा उमगत नाही?
मी असाच सरणावर सरणार आहे, हे कुणासही उमगणार नाही
राख राख होईल जेव्हा, उमगेल कदाचित जीवंत होता
जगला कसा अन् गेला कसा कधी कुणास उमगणार नाही
असतील , आहेत कित्येक सोबत, परी सोबतीला कुणी नाही ...............
प्र.........साद जोशी
पुणे
२८.०८.२००९
No comments:
Post a Comment