चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Tuesday, June 9, 2009

भैरवी

कुणी गाताना भैरवी , दिल्या वचनांची शपथ जीवघेणी असते गं ,
उसवलेल्या शिवणीची सल नकळत हातात रुतते गं !
तसा मी तुझा कुणीच नव्हतो असेही म्हणता येईल गं ,
बोटावर झेललेला तो अश्रुचा थेम्ब मनतळ गाठून येतो गं !
ते क्षण सरले अन् कुणीच न् उरले , आपले कुणाला म्हणू गं ,
मीही तोच तुही तीच , भवताल मात्र अजून विराणच गं !
मन सांगे एक करावे , उमेद नाही उरली गं ,
सांग अता तूच मला गायलीस कां ती भैरवी गं !

No comments:

Post a Comment