तुला सोडायला आलो आहे ..
नातं थोडं तोडू नकोस
डोळे ओले होऊ देऊ नकोस
हट्ट करू नकोस मन घट्ट करायचा
घट्टच करायचा असेल तर निर्धार कर
सई जाईच्या वेलाशी थांबली असेल
सर्व बन्धान्ना निर्बंध कर
मन घट्ट करून सईला आपलेसं कर
तिचं अजुन लग्न व्ह्यायचं आहे नां ?
घुसमट स्वत:ची थाम्बवुन टाक
ऐक आता तरी सईची हाक
मोठेपणा घेउन साध्य काहीच होत नाही
दोघे सुखी होण्यासाठी एकत्र यायला हवं नां?
आज जर दिली नाहीस हाकेला ओ
कधीच कुणी सुखी होणार नाही
तीन आयुष्य कां मित्रा संपवतो आहेस
कुणीतरी कधीतरी समजुन घेइल नां ?
प्र....साद जोशी
पुणे
२९.०८.२००९
No comments:
Post a Comment