साद दिली
याद आली
ओ नाही
मी तसाच
घरटे पडले
पिल्लू एकाकी
आई हरली
मी तसाच
कुणा सांगावे
जग सुकलेले
प्रयत्न संपले
मी तसाच
पाकळ्या जमिनीवर
फुले कोमेजलेली
झाडही पडले
मी तसाच
मी सरणावर
लाकडे सर्व ओली
वाट पाहणे आले
मी तसाच
मी तसाच ..........................
प्र .............. साद जोशी
पुणे
०९.११.२००९
This comment has been removed by the author.
ReplyDeletekhup surekh aahe hi kavita....
ReplyDeleteHarish Mandavkar