आठवणी बांधावरच ठेवून बघ एकदा,
कधी मैत्रीचा सांधा जुळतो कां ?
रेशीमगाठी न् उलगड़ता अशाच ठेव
स्नेहाचे बंध कधी सुटतील कां ?
चाकोरी तुझीच तू ठरवलीस,
वज्रप्रहार होवुनच कां दिलास ?
निस्वार्थ जगायचे ठरले होते मग
पाखरांची वाट कां पाहतोस रे ?
प्र...साद जोशी
पुणे
२९.०८.२००९
No comments:
Post a Comment