चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Thursday, July 14, 2011

एकच सुखाचं स्वप्न पुरेसं नाहीये कां काही लिहायला ?

काय रोज रोज दुखः कुरवाळत एखादी कविता लिहायची ?
एकच सुखाचं स्वप्न पुरेसं नाहीये कां काही लिहायला ?
रोज रोज एक दिवस पार पडला कशाला म्हणायचं ?
उद्याचा दिवस किती सुरेख असणार आहे असं कां नाही बोलायचं ?

उद्या सकाळचा कितीचा गजर लावायचा असं कशाला बोलायचं ?
आजची रात्र सुरेल स्वप्नात जाणार आहे असंच नाही कां बोलायचं ?
सकाळचा पेपर उघडून उगीच वाईटसाईट बातम्या कशाला वाचायच्या ?
छान कॉम्पुटर उघडून फेसबुक वर मित्रांना शुभ प्रभात कां नाही बोलायचं ?

ऑफिसला पोचून फाईलचा गठ्ठा पाहून तोंड कशाला वाकडं करायचं ?
दुपारी डब्याचा आस्वाद घ्यायचा आहे हे मनात कां नाही आणायचं ?
संध्याकाळ होता होता घड्याळ लवकर पुढे कां सरकत नाहीये असं मनात कां आणायचं ?
स्टेशन वरचा गजरेवाला आणि बायको आपली वाट पाहताहेत असं स्वतःला कां नाही विचारायचं ?

एक विचारू कां मित्रांनो ?
आपलं आपण आपल्यासाठी कधी हो जगायचं ?
इतके सोबती असतात नां ?
मग उगीच माझ्या बाबतीतच असं कां होतं असं कां कुढत जगायचं ?

आता ठरवून टाका स्वतःशीच माझं जग मीच आहे बांधायचं ...
घरट्यातले सगळे सुरक्षित आहेच, अता जरा आजूबाजूला सुद्धा पाहायचं
माझं दुखः मला ठाऊक नाहीये हे स्वतःला शेवटचं सांगून टाकायचं
जगभर फक्त सुख आहे ते गोळा करायचं अन् वाटत सुद्धा फिरायचं !

प्र...साद जोशी.
पुणे
१२.०७.२०११

Wednesday, June 29, 2011

प्रेम उरात दाटतेच नां ?

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे मला रोज सांगावं लागतंच नां ?
मी नाही सांगितलं तरी आपलं प्रेम उरात दाटतेच नां ?
जरा नजरेआड गेलीस की श्वास थांबल्यासारखा वाटतोच नां ?
कितीही दूर गेलो तरी तुझ्या अगदी जवळ नेहमी असतोच नां ?

प्र...साद 

काल रात्रीपासून छातीत फार धडधडतय हो ,

धूमशान पावसाचे थैमान आभाळभर दिसतेय
काल रात्रीपासून छातीत फार धडधडतय हो ,
मला हल्ली वेधशाळेचे अंदाज खरेच दिसताहेत
ते म्हणाले दोन दिवस पाऊस, पडला की हो
काल रात्रीपासून छातीत फार धडधडतय हो ,

काल पासून काहीतरी विचित्र चित्र दाखवताहेत
कुठे ही कमी दाबाचा किंवा अधिक दाबाचा पट्टा पण नाहीये
तरी त्या विचित्र चित्रात मुंबई आणि पुण्यात खूप ढग दिसताहेत हो
आणि त्यावर म्हणजे कालपासूनचा पाऊस न् थांबता अजूनच वाढतो आहे हो
काल रात्रीपासून छातीत फार धडधडतय हो ,

तसा मी पावसाळ्यात कुठे बाहेर सहसा पडतच नाही
खरे सांगायचे तर अजिबातच बाहेर पडत नाही हो
पण मला माझ्या मित्रांची फारच काळजी वाटायला लागली आहे
मिठी , मुळा , मुठा आणि महानगरपालिका यांचे कधीच काही सांगता येत नाही हो
काल रात्रीपासून छातीत फार धडधडतय हो ,

मी की नै फाआर्र्र्रर्र पूर्वी नोकरी करायचो तेव्हा अमेरिकेतल्या लोकांना
आम्ही खूप प्रकारची माहिती पुरवायचो अर्थात पैसे घेवूनच
तिथे ना एक दीड दिवस आधीच संकटाची तयारी करायचे हो
आपल्याला अशी काही सवय नाही म्हणून मित्रांची काळजी वाटते हो
काल रात्रीपासून छातीत फार धडधडतय हो ,

पावसाळी महिन्यांच्या काही भरोसा नाही हो
मंगळागौरीच्या साड्यान्ना मकरसंक्रांतीला भिजताना पाहिलेय मी
मला सौमित्र , गुरु आणि ना. धों च्या कवितांचा राग नाहीये हो
ऐन पावसात गावी जाताना माझ्याच गाडीचा वायपर खराब झालेला पाहिलंय मी
काल रात्रीपासून छातीत फार धडधडतय हो ,

प्र...साद
११.०६.२०११

पागोळीच्या थेम्बांवर

पावसात वाट पाहिली कुणी कितीदा
अवघडून गेलो बसल्या जागी बरेचदा !
पागोळीच्या थेम्बांवर बहकलो अनेकदा
पावसातच गात बसलो मित्रांसंगे कित्येकदा !

प्र...साद

जर आला उन्हाचा कवडसा पावसातून
देईन धाडून मी त्यास मृगेषाकडे
झेलीत राहीन मग मृगकवडसे एकटाच
हसेन हलकेच अन् सोडेन थोडे तिच्याहीकडे
प्र...साद

पाऊस हा ....

गंध ओला ...
गंध माझा
गंधातून स्निग्ध झाला
रंध्रातूनी झिरपला
पाऊस हा ......

मीही भिजलो
कपडे ओले
प्राजक्त गंधात दरवळला
रोमरोमी पसरला
पाऊस हा .....

खोटे तुझे खरे झाले
चिंब पैसा छोटा झाला
मी माझ्यातच कधी गुरफटलो
अंग न् रंग एक झाला
पाऊस हा .....

दार उघडे
खिडकी भिजली
पडद्यातुनी चिंब चिंब हलकेच डोकावला
गंध, रंग, अन् अंग एक झाले
पाऊस हा ....

प्र...साद जोशी
१२.०६.२०११
पुणे

प्राजक्त मला गोंजारीत होता !

खाली शेवाळ असं साठलं
पाऊस अन् गळक्या खिडक्या
खाली पारिजातकाचा असा सडा
पाऊलच काय मनदेखील घसरलं

असा सपशेल आडवा मी त्या सड्यावरी
गंधात त्याच्या गुंतून गेलो
हात शेवाळी गाल केशरी
प्राजक्ताने मला सावरलं

हातातुनी त्या पायघड्या
माझीच वाट पहात होत्या
मन दरवळलं त्याच वेळी
भीडेनी माझ्या मलाच सोडलं

मग तसाच त्या शेवाळाला
अंगणाचे अंथरूण केले
फुंकर मारायची गरज नव्हती
प्राजक्ताने मन मोहरले

लाज कुणाची अन् कशाला
पारिजात तो माझा होता
मी त्या कुशीत तसाच होतो
प्राजक्त मला गोंजारीत होता !

प्र...साद जोशी
१२.०६.२०११

खेळाचेच जगणे झाले !!!

कागदावरी शब्द उमटला
शब्दातुनी अर्थ सांडला
अर्थातुनी खेळ मांडला
खेळाचेच जगणे झाले
प्र...साद

तरी मस्ती तशीच मनात आहे नां ?

त्या आपल्या तिठ्यावर भेटायचो तेव्हा
आपण सगळे तसेच मस्त असायचो नां ?
आज किती वर्षांनी भेटलो
तरी मस्ती तशीच मनात आहे नां ?

भजी आठवताहेत त्या कुंद हवेतली ?
वाफाळता चहा सुद्धा कधी संपायचा कळायचेच नाही नां ?
कधी दूर गेलो असे कधी वाटलेच नाही नां ?
मस्ती अजून मनात तशीच आहे नां ?

उगीच लोक म्हणताहेत की बऱ्याच वर्षांनी भेटताय नां ?
मला कधी वाटलेच नाही आपण कधी मनाने दूर होतो म्हणून
आज त्या तिठ्यावर खूप जणांचा घोळका आहे नां ?
चहावाल्याने अजून आपल्याला लक्षात ठेवलंय नां ?

परत भेटू असेच अचानक न् ठरवता
कुठल्याच हाकेला ओ द्यायची सवय आपल्याला आहेच नां ?
तशी हाकेला हाक म्हणायची आपल्याला सवय अजिबात नाही नां ?
न् बोलावता सादेला प्रतिसाद द्यायची तशी आपली सवय जुनीच आहे नां ?

प्र...साद जोशी
१९.०६.२०११
पुणे

प्राजक्ताचा सडा !

सांजवेळी तीच अबोली अंगणात
अंगणी माझ्या प्राजक्ताचा सडा
रंगरूप अन् गंध पाहुनिया मोही
वाटे दोघींनाही हेवा !

प्र...साद 

नंदादीप

तुझ्यावर जीव ओवाळायला
मी काय एखादं निरांजन आहे ?
मनगाभारा आपल्या दोघांचा तर आहे
नंदादीप प्रेमाचा कायम तेवत तर आहे !

प्र...साद

मी माझं प्राक्तन स्वत:च लिहितो आता !!!

गाता येत नाही म्हणताना
एक अशी तान गेली निघून
लिहिताना येत नाही म्हणताना
लेखणीतून एकच वार गेला सुटून

कुणाला काय वाटेल याची फिकीर नाही मला
मी कधी मलाच भीक नाही घातली
दुसऱ्यांची चिंता मी कां अन् कशाला करू
मी फिरस्ता अत्ता आहे इथे जाईन कधीही निघून

मी माझ्यासाठी जगतोय याची जाणीव नव्हती
अर्थात आजवर मीही तशी कुणाला दर्शवली नाही
माझ्या कुबड्या आता दुसऱ्यांसाठी वापरणे सोडून दिलंय
माझे पाय पूर्ण समर्थ आहेत माझेच मला कुठेही न्यायला !

एक मागणं मात्र राहूनच गेलं
जे तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं
मी माझं प्राक्तन स्वत:च लिहितो आता
सोबत होतो आता नाही असा दोष नको आता !

प्र...साद
२९.०६.२०११

दुख को बाहोमे समेटना छोड दिया है मैने !!!

दुख को बाहोमे समेटना छोड दिया है मैने
सुख कभी मुठ्ठीमे में नही होता ये जान लिया मैने

बडे लोग कहते है की सुख मुठ्ठीमेसे रेत की तरह फिसल जाता है
सकारात्मकता खून में मिली और सुख को अपने ही हृदय में पाया मैने

जखमो को कुरेदना आदत थी मेरी
अपने पर ही आसू बहाना पसंद था मुझे
जखमोसे उपर सुख की चादर कभी ढून्डी नही मैने
मेरे पास ही थी ये कभी जाना ही नही मैने

आज सरकती जाती है जिंदगी अपने ही धून मै
मै भी गाता हू अपने ही सुकून से
ये शायद कोई चमत्कार माने कोई
अपने आप पा लिया है खुद को मैने

दुख का बसेरा होगा ये जानता है हर कोई
इम्तेहान हर किसीका होगा ये भी जानता हर कोई
अपनी ही धून में गीत गाता हू मै अभी
आगे बढना अब मेरी फितरत बन चुकी है ये जानता है हर कोई

प्र...साद जोशी
पुणे
२०.०६.२०११

आम्ही सगळे सोडायला गेलो ती तिथे एकटीच होती !!!

आम्ही सगळे सोडायला गेलो ती तिथे एकटीच होती
आम्ही आमची कामे वाटून घेतली होती
कुणी पासाचे काम पाहायला गेलं .
कुणी लाकडे नीट आहेत ना हे पहायला
 ती तरी सुद्धा एकटीच होती ...

आमच्या गोतावळ्यात एकच कोलाहल झाला
आमचा मित्र इतका वेळ सावरलेला
अचानकच उन्मळला आणि कोलमडून गेला
आम्ही सगळे धीर द्यायला धावलो
तरी ती तिथे एकटीच होती ...

आम्ही त्याला बरेच सावरले
तोही लहान मुलासारखा आमचे अता ऐकू लागला
पुढचे विधी चालू झाले , शेवटचे दर्शन हरेक घेऊ लागला
रांग जसजशी कमी झाली शेवटचा प्रवास सुरु झाला
तरी ती तिथे एकटीच होती ...

काही वेळानी परत उद्या सकाळी कुणी यायचे
यावर विचार होऊ लागला
उद्याचा दिवस खराब, अस्थी विसर्जन परवा करावे
असा एकदाचा निकाल लागला
तरी ती तिथे एकटीच होती ...

आम्ही सगळे परतायला एकत्रच निघालो
ऐन पहाट होत होती
आता मात्र त्या दोघी तिथे सोबत होत्या
एकमेकींना साथ शेवटची देत होत्या

प्र...साद
०५.०५.२०११

Sunday, May 1, 2011

रिकाम्या शब्दाच्या झोळ्या

लोकांना हसवायला शिकवून मी असाच स्तब्ध आहे ,
सरणावरी गेलो तरी माझे हसू मी टिकवून आहे ....
प्र...साद

मेल्याने मरण संपत नाही
मरणाने माणूस संपत नाही
संतापाने माणूस उरत नाही
काहींना मी उगीच संत म्हणत नाही
प्र...साद

राखेशी माझ्या येवून अजिबात काही बोलू नका
इथेतरी मला जरा निवांतपणा मिळू द्या
कुठेतरी वाहायला तर मला नक्कीच नेवू नका
ज्या प्राजक्ताचे बुंधे कापलेत तिथेच मला सोडून द्या
प्र...साद

परत परत धन्यवाद म्हणायला मला येतो कंटाळा
या विषयावरून वाद नकोत म्हणून तरी मला टाळा
कधीतरी स्पष्टीकरणाच्या जागांमधून मला गाळा
मग पहा या दुनियेत मी करतो रिकाम्या शब्दाच्या झोळ्या
प्र...साद

Tuesday, April 12, 2011

घुसमटलेले दुख:

कधी या संशोधकांचा इतका राग येतो
हाताहून सगळे घरंगळले की खाली पडले म्हणतात ....
हातातून निसटून गेलेले क्षण हृदयी कां असे ठसठसते
अश्रुन्वाटे घुसमटलेले दुख: कां मनी असे बिलगुनी बसते
प्र...साद
१२.०४.२०११

तुझी आठवण

सहजच ...
आज किती कालांतरानी तुझी आठवण,
मेंदू झिणझिणत जावा इतक्या तुझ्या आठवणीची साठवण....
ज्या जगण्यावर प्रेम करावे असे काही उरलेच नाही,
त्या मरणाने आपणहून यावे अशी माझी पात्रतासुद्धा नाही....!
 प्र...साद
१२/०४/२०११

Tuesday, April 5, 2011

पायवाट

१) मी चालत जाताना
पायरव कधीच होत नाही ,
ती यायच्या क्षणी मात्र
जीव माझा माझाच रहात नाही !

प्र...साद

२) हलकीशी एक फुंकर ,
अलवार जखमेलाही गुंगवणारी
छानसे एक फुलपाखरू ,
गुंतलेल्या फुलालाही झुलवणारे !

प्र...साद

३) मी मागे वळून कधीच पहात नाही
ती जातानाची जाणीव खोलवर घाव करते
तीसुद्धा काल म्हणाली मागे वळून पाहू नकोस
समजले तेव्हा मलाही जाताना पायवाट ओलसर कां लागते !

प्र...साद
०५.०४.२०११

Friday, March 18, 2011

एकवटुनी सारे बळ ...

एक पाखरू अवघडलेले ,
कळपापासून दुरावलेले ...
शोधत होते सखेसोबती
जरी मिळाले .... तरी न् पटलेले ..
झाले बेभान एका अनामिक क्षणी
विस्कटले पंख जमिनीवरी ....
वाटले .. संपले .. आयुष्य विस्कटले
कधी न् उडणार असे वाटले ...
अचानक असे घड्याळ थांबले
काटे जणू जगण्याला भिडले ....

कुठूनी आला सुखावह वारा
उघडूनी मनातल्या सर्व खिडक्या दारा ...
एकवटुनी सारे बळ मग
उभे राहिले उडवायला ...
झेपावयाला मग फक्त सुर्याचकडे !!!

प्र...साद जोशी.
13.03.2011

Saturday, March 5, 2011

शायद कही न् कही

दिल कां दरवाजा खुला ही रखा करो ..

कौन जाने कब जाना पहचानासा मुसाफीर लौट आये !

फिक्र ना करो अंजाम की ...
...
रिश्ते ही तो है संभल जायेंगे !

चिलमन से क्या पुछना

आंखे दस्तक जो दे रही है !

जाने की जिद जायज है जरूर

फिर लौट के आने कां बहाना धूंड लेना !

तकाजा होगा शायद उस लम्हे कां ....

अतीत के साये में गुम मत हो जाना

लौटते साये को हम भी ताक राहे है !

प्र...साद

०५/०३/२०११

Tuesday, March 1, 2011

माझ्या SMS कविता भाग ( २ )

माझ्या SMS कविता भाग ( २ )

१ ) काठावर बसलो होतो
     तुझ्याकडे यायच्या आधी
    ओंजळ भरून पारिजातक
   तुझ्याघरी पाहिलं तर .......
  
  माझी ओंजळ मला खरेच
  ताजी आणायची होती ग !

  कोमेजली तरी हात बघ माझे
  अजून केशरीच आहेत ग !

प्र...साद जोशी

२)  वाटते जणू आयुष्य संपून जावे एकाच क्षणात
     तो क्षण येण्यासाठी पण साला काही काळ जगावेच लागते

प्र...साद जोशी

३)  एकदा जिंदगीने विचारले
    किती जगलास अन् किती जिंकलास ?
   मी म्हणालो अनेक मित्र मैत्रिणींना आपलेसे केले हे असे जग जिंकले
   आणि त्यांचा श्वास न् श्वास मीच जगलो मी कायम असाच जगलो

प्र...साद जोशी

४) दिवस साजिरा जावा
  मन धावूदे माझ्या गावा
  आली आठवण माझी तर
  ओसरीत एखादी पणती लावा ....

प्र...साद जोशी

५)  तू आशयांचा घनसागर,
     मी एक दवबिंदू !
     तू अंगणभर सरावलेला गेरू ,
    मी न उमटलेल्या रांगोळीचा बिंदू !
     तू गर्द पसरलेली घनदाट वनराई ,
    मी टिपकागदावरली वाया गेलेली शाई !

प्र...साद जोशी

६)  मनातले ओठावर यावे ,
    असा काही नियम नसतो !
    समजून घ्यावेत भव मनातले ,
    डोळे आपले बोलतातच ...
    ओळखण्याचा काळ असतो !

प्र...साद जोशी

७)  जरी असलो मी कोरडा पाषाण ,
     कुणी सांगितले न द्यावे शिक्षण !
     सरकते पाणी उतरते ....
     पाणी उतारावरून ,
     कुणी न् सांगता थांबते झाडाझाडांमधून

प्र...साद जोशी

८)  एकदा ठरवतो मी जायचे
    आभाळाच्याही पलीकडे ,
    पंख तेव्हाच तोकडे पडतात ,
   मी पुन्हा आवरतो मलाच
   झेपावण्यासाठी .....
    क्षितिजाच्याही पलीकडे जिथे
   आभाळसुद्धा तोकडे पडते

प्र...साद जोशी.

९)   आभाळात तो घन असाच घुमत होता ...
     मी म्हटलं आपलं काही नाते आहे कां रे ?
     घनच तो गदगदून हसला
    अन् म्हणाला
     अगदी बरोबर ओळखलेस पण .....
    बरसण्याची वेळ सरून गेली रे !
    अता फक्त तुम्हाला पाहणे उरलंय
    आणि डोळे भरून आले की
    तुझ्या घराच्या छतावर चार थेंब शिडकावा करायचा अन्
   चालते व्हायचे
    अता तुमच्या आयुष्यात फार काळ नाही डोकावायचं
    आपले आपण आभाळभर फक्त भटकायचं !!!

प्र...साद जोशी

१०)  जगण्याला गाणे म्हणालो ,
      भयाचीसुद्धा स्वगते म्हणालो !
      सख्ख्या नात्यांना ओळख दाखवावी लागली ,
     मित्रांना साद घालावीच नाही लागली !

प्र...साद जोशी.

११)   जन्ममृत्यूतले अंतर ,
      कायमचा गुंता .....
      जगणे जगावे सुंदर  ,
      मग कशाची चिंता
      हेवा वाटावा असे मित्र
      आयुष्यभर असावे
      हेची मागणे देवासी आता !!!

प्र...साद जोशी.

Thursday, February 17, 2011

झाड एकाकीच !!!

1) झाड एकाकीच असते कायम
   पंथी बसती दिवसा खाली
   झाड सदैव रुंजी घालत बसते
  चांदण्याच्या बरसातीसाठी !!!

          प्र...साद

2) मावळतीचा सूर्य म्हणू की ....
   उगवतीचा चंद्र म्हणू ,
  संपला म्हणालो तरीही चाले...
  रात्रीसुद्धा चांदणे पडे .......
     
      प्र...साद
3) वाटेवरुनी निसटत जाती जुन्या आठवणी
    रस्ता थकतो पंथीही थकतो .....
   रेंगाळणाऱ्या वाटेवरुनी येते एक शिकवणी
  पुढे जायचे असते मित्रा , सूर्य उद्याचा वाट बघे !!!


               प्र...साद
4) एक गुलमोहर वेगळाच असतो
   शिशिरातही उमलुनी बघतो ,
  वसंताचा खेळ निराळा
  पानोपानी मन करते खुळा !!!

         प्र...साद
5) अस्मानीचा रंग निळा ...
    करी मजला वेडाखुळा,
   बहरलेल्या झाडासंगे...
   वेळूनाद करतो कृष्ण सावळा !!!

       प्र...साद


6) मायेलाही अंतच नसतो ....
   जशी माउली सर्वांसाठी ,
   झाड बहरते कधी पानगळती...
   सुगरणीचा संग मात्र फांदीवरती !!!

       प्र...साद

मालकंस !!!

बंदिस्त जीवाला करुनिया मुक्त तू ...
म्हणुनी झालीस बेभान तू
मुक्त ऐश्या जीवनी या ....
रंगातुनी न्हाहिलीस तू .....

शब्द उन्हाचे बंदिवान असती ....
सांयकाळी ना धरबंध त्यांना
भैरवी गात असता कां आठवावा
कुणाला कसा मालकंस हा .....

बंदिवान हे जगची असते
कुणी नसतो बंदी इथे
बेड्यांना पेलावयाला
सखेसोबती सांगती इथे .......

प्र...साद
१०.०२.२०११

बंदिवान

बंदिस्त जीवाला करुनिया मुक्त तू ...
म्हणुनी झालीस बेभान तू
मुक्त ऐश्या जीवनी या ....
रंगातुनी न्हाहिलीस तू .....

शब्द उन्हाचे बंदिवान असती ....
सांयकाळी ना धरबंध त्यांना
भैरवी गात असता कां आठवावा
कुणाला कसा मालकंस हा .....

बंदिवान हे जगची असते
कुणी नसतो बंदी इथे
बेड्यांना पेलावयाला
सखेसोबती सांगती इथे .......

प्र...साद
१०.०२.२०११

मालकंस !!!

बंदिस्त जीवाला करुनिया मुक्त तू ...
म्हणुनी झालीस बेभान तू
मुक्त ऐश्या जीवनी या ....
रंगातुनी न्हाहिलीस तू .....

शब्द उन्हाचे बंदिवान असती ....
सांयकाळी ना धरबंध त्यांना
भैरवी गात असता कां आठवावा
कुणाला कसा मालकंस हा .....

बंदिवान हे जगची असते
कुणी नसतो बंदी इथे
बेड्यांना पेलावयाला
सखेसोबती सांगती इथे .......

प्र...साद
१०.०२.२०११