चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Tuesday, March 1, 2011

माझ्या SMS कविता भाग ( २ )

माझ्या SMS कविता भाग ( २ )

१ ) काठावर बसलो होतो
     तुझ्याकडे यायच्या आधी
    ओंजळ भरून पारिजातक
   तुझ्याघरी पाहिलं तर .......
  
  माझी ओंजळ मला खरेच
  ताजी आणायची होती ग !

  कोमेजली तरी हात बघ माझे
  अजून केशरीच आहेत ग !

प्र...साद जोशी

२)  वाटते जणू आयुष्य संपून जावे एकाच क्षणात
     तो क्षण येण्यासाठी पण साला काही काळ जगावेच लागते

प्र...साद जोशी

३)  एकदा जिंदगीने विचारले
    किती जगलास अन् किती जिंकलास ?
   मी म्हणालो अनेक मित्र मैत्रिणींना आपलेसे केले हे असे जग जिंकले
   आणि त्यांचा श्वास न् श्वास मीच जगलो मी कायम असाच जगलो

प्र...साद जोशी

४) दिवस साजिरा जावा
  मन धावूदे माझ्या गावा
  आली आठवण माझी तर
  ओसरीत एखादी पणती लावा ....

प्र...साद जोशी

५)  तू आशयांचा घनसागर,
     मी एक दवबिंदू !
     तू अंगणभर सरावलेला गेरू ,
    मी न उमटलेल्या रांगोळीचा बिंदू !
     तू गर्द पसरलेली घनदाट वनराई ,
    मी टिपकागदावरली वाया गेलेली शाई !

प्र...साद जोशी

६)  मनातले ओठावर यावे ,
    असा काही नियम नसतो !
    समजून घ्यावेत भव मनातले ,
    डोळे आपले बोलतातच ...
    ओळखण्याचा काळ असतो !

प्र...साद जोशी

७)  जरी असलो मी कोरडा पाषाण ,
     कुणी सांगितले न द्यावे शिक्षण !
     सरकते पाणी उतरते ....
     पाणी उतारावरून ,
     कुणी न् सांगता थांबते झाडाझाडांमधून

प्र...साद जोशी

८)  एकदा ठरवतो मी जायचे
    आभाळाच्याही पलीकडे ,
    पंख तेव्हाच तोकडे पडतात ,
   मी पुन्हा आवरतो मलाच
   झेपावण्यासाठी .....
    क्षितिजाच्याही पलीकडे जिथे
   आभाळसुद्धा तोकडे पडते

प्र...साद जोशी.

९)   आभाळात तो घन असाच घुमत होता ...
     मी म्हटलं आपलं काही नाते आहे कां रे ?
     घनच तो गदगदून हसला
    अन् म्हणाला
     अगदी बरोबर ओळखलेस पण .....
    बरसण्याची वेळ सरून गेली रे !
    अता फक्त तुम्हाला पाहणे उरलंय
    आणि डोळे भरून आले की
    तुझ्या घराच्या छतावर चार थेंब शिडकावा करायचा अन्
   चालते व्हायचे
    अता तुमच्या आयुष्यात फार काळ नाही डोकावायचं
    आपले आपण आभाळभर फक्त भटकायचं !!!

प्र...साद जोशी

१०)  जगण्याला गाणे म्हणालो ,
      भयाचीसुद्धा स्वगते म्हणालो !
      सख्ख्या नात्यांना ओळख दाखवावी लागली ,
     मित्रांना साद घालावीच नाही लागली !

प्र...साद जोशी.

११)   जन्ममृत्यूतले अंतर ,
      कायमचा गुंता .....
      जगणे जगावे सुंदर  ,
      मग कशाची चिंता
      हेवा वाटावा असे मित्र
      आयुष्यभर असावे
      हेची मागणे देवासी आता !!!

प्र...साद जोशी.

No comments:

Post a Comment