चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Wednesday, June 29, 2011

प्राजक्त मला गोंजारीत होता !

खाली शेवाळ असं साठलं
पाऊस अन् गळक्या खिडक्या
खाली पारिजातकाचा असा सडा
पाऊलच काय मनदेखील घसरलं

असा सपशेल आडवा मी त्या सड्यावरी
गंधात त्याच्या गुंतून गेलो
हात शेवाळी गाल केशरी
प्राजक्ताने मला सावरलं

हातातुनी त्या पायघड्या
माझीच वाट पहात होत्या
मन दरवळलं त्याच वेळी
भीडेनी माझ्या मलाच सोडलं

मग तसाच त्या शेवाळाला
अंगणाचे अंथरूण केले
फुंकर मारायची गरज नव्हती
प्राजक्ताने मन मोहरले

लाज कुणाची अन् कशाला
पारिजात तो माझा होता
मी त्या कुशीत तसाच होतो
प्राजक्त मला गोंजारीत होता !

प्र...साद जोशी
१२.०६.२०११

No comments:

Post a Comment