चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Wednesday, June 29, 2011

तरी मस्ती तशीच मनात आहे नां ?

त्या आपल्या तिठ्यावर भेटायचो तेव्हा
आपण सगळे तसेच मस्त असायचो नां ?
आज किती वर्षांनी भेटलो
तरी मस्ती तशीच मनात आहे नां ?

भजी आठवताहेत त्या कुंद हवेतली ?
वाफाळता चहा सुद्धा कधी संपायचा कळायचेच नाही नां ?
कधी दूर गेलो असे कधी वाटलेच नाही नां ?
मस्ती अजून मनात तशीच आहे नां ?

उगीच लोक म्हणताहेत की बऱ्याच वर्षांनी भेटताय नां ?
मला कधी वाटलेच नाही आपण कधी मनाने दूर होतो म्हणून
आज त्या तिठ्यावर खूप जणांचा घोळका आहे नां ?
चहावाल्याने अजून आपल्याला लक्षात ठेवलंय नां ?

परत भेटू असेच अचानक न् ठरवता
कुठल्याच हाकेला ओ द्यायची सवय आपल्याला आहेच नां ?
तशी हाकेला हाक म्हणायची आपल्याला सवय अजिबात नाही नां ?
न् बोलावता सादेला प्रतिसाद द्यायची तशी आपली सवय जुनीच आहे नां ?

प्र...साद जोशी
१९.०६.२०११
पुणे

No comments:

Post a Comment