धूमशान पावसाचे थैमान आभाळभर दिसतेय
काल रात्रीपासून छातीत फार धडधडतय हो ,
मला हल्ली वेधशाळेचे अंदाज खरेच दिसताहेत
ते म्हणाले दोन दिवस पाऊस, पडला की हो
काल रात्रीपासून छातीत फार धडधडतय हो ,
काल पासून काहीतरी विचित्र चित्र दाखवताहेत
कुठे ही कमी दाबाचा किंवा अधिक दाबाचा पट्टा पण नाहीये
तरी त्या विचित्र चित्रात मुंबई आणि पुण्यात खूप ढग दिसताहेत हो
आणि त्यावर म्हणजे कालपासूनचा पाऊस न् थांबता अजूनच वाढतो आहे हो
काल रात्रीपासून छातीत फार धडधडतय हो ,
तसा मी पावसाळ्यात कुठे बाहेर सहसा पडतच नाही
खरे सांगायचे तर अजिबातच बाहेर पडत नाही हो
पण मला माझ्या मित्रांची फारच काळजी वाटायला लागली आहे
मिठी , मुळा , मुठा आणि महानगरपालिका यांचे कधीच काही सांगता येत नाही हो
काल रात्रीपासून छातीत फार धडधडतय हो ,
मी की नै फाआर्र्र्रर्र पूर्वी नोकरी करायचो तेव्हा अमेरिकेतल्या लोकांना
आम्ही खूप प्रकारची माहिती पुरवायचो अर्थात पैसे घेवूनच
तिथे ना एक दीड दिवस आधीच संकटाची तयारी करायचे हो
आपल्याला अशी काही सवय नाही म्हणून मित्रांची काळजी वाटते हो
काल रात्रीपासून छातीत फार धडधडतय हो ,
पावसाळी महिन्यांच्या काही भरोसा नाही हो
मंगळागौरीच्या साड्यान्ना मकरसंक्रांतीला भिजताना पाहिलेय मी
मला सौमित्र , गुरु आणि ना. धों च्या कवितांचा राग नाहीये हो
ऐन पावसात गावी जाताना माझ्याच गाडीचा वायपर खराब झालेला पाहिलंय मी
काल रात्रीपासून छातीत फार धडधडतय हो ,
प्र...साद
११.०६.२०११