तो तसाच बस मधून निघून गेला !!!
आजचा दिवस पण असाच आला अन् फुकट गेला
एक जण थाम्बलेला स्टॉप वर खूप वेळ पण फायदा नाही झाला
रेट पण कमी करून पाहिला, बराच वेळ त्याच्या मागे गेला
पण काही फायदा नाही झाला, तो तसाच बस मधून निघून गेला !
तो खरं तर त्यातला वाटत नव्हता, पण प्रयत्न तर करून पाहिला
दोन दिवस झाले होते एक पण खरेच धंदा झाला नव्हता
पोटासाठी तो स्टॉपच माझ्या एरिया मधला होता

पण साला बरे झाले तो निघून गेला, दोनच मिनिटानी एक गाडीवाला आला
दोन काय चार दिवस धंदा नाही केला तरी चालेल असा माल देवून गेला
आपल्या डोक्यात अजुन तोच साधा माणूस राहुनच गेला
उगीच बिचारयाला अर्धा तास त्रास दिला, आपले नशीब आपल्याला पैसा देवून गेला
पण काही फायदा नाही झाला, तो तसाच बस मधून निघून गेला
सोबत आपली घुसमट मात्र घेवून नक्की गेला
प्रत्येक सिगरेट सोबत त्याला होणारा वैताग त्याच्या चेहरयावर दिसत होता
बरं झालं माझा काही फायदा नाही झाला, तो तसाच बस मधून निघून गेला

कमीतकमी एक माणूस आपल्या या चक्रात नाही अडकला, थोडं समाधान देवून गेला
आता चार दिवस तो विचार करेल माझा उगीचच माझं काय झाल्याचा
करुदे विचार बिचारयाला, समाधान माझं मोठं आहे , तो तसाच बस मधून निघून गेला !!!
प्र....साद जोशी
पुणे
३०.०८.२००९