आरसा नेमका त्या भिंतीवर अडकवलेला असायचा खिळ्यावर,
आरश्याचा खिळ्यासाठीचा भाग आणि भिंत अगदी एकरूप होते
माझा चेहरा, तिच्या टिकल्या आणि त्या सोबत आरश्यानं दडवून ठेवलेलं मागचं सगळं अगदी स्पष्ट असलं तरी कायम अदृश्य असायचं शेंदूर पुसट होत गेला ,
आरश्यातला पारा काळाच्या वेगात आपला स्थायीभाव सोडत गेला आणि रासायनिक विशेषत्व हातचे न सोडू देता त्याला जसं जमेल तसा रहात गेला.
आणि त्यासोबत आरश्यामागची भिंत मात्र अधिकच ठाशीव आणि रंगीत आपल्या मालकी भिंतीच्या मूळ रंगाशी इमान राखत राहिली ...
अगदी एखाद्या गावठी कुत्र्यागत एकेकाळी रुबाबदार असलेल्या पण आता डोळ्यात फुल पडलेलं आणि अंगभर लूत लागलेली असल्यानं कुणीच जवळ फिरकू देत नसल्यासारखी भगवान साक्षात्कार देतात तेव्हा त्यांना हव्या त्या रुपात देतात नां तसा आमचा टांगलेला आरसा वागायला लागला ... म्हणजे पाठभर उटणं फासलेला दिवाळीच्या अभ्यंगाला माझा देह होतो तसा अगदी तसाच...
आरसा शेंदूर गायब होत असताना आरश्याच्या मूळ स्वरूपाचे म्हणजे निरभ्र काचेचे दर्शन द्यायला लागला द्वैत अद्वैताचा कायमचा खेळ जणु ! आणि पारा ??? पारा आमच्या नात्यातल्या गहिरेपणासारखा हरवत राहिला सालागणीक दिवसागणीक काहीदा अगदी क्षणांगणीक ...
एक दिवस म्हणजे कदाचित आजचीच सकाळ असावी ती ...
आरसा लख्ख झाला माझा चेहरा एकदम खडबडीत दिसायला लागला नेमका मागच्या भिंतीसारखा फक्त काचेच्या एका बाजूला शून्य रंग होते आणि दुसऱ्या बाजूला रंगांची उधळण होती पारा घरभर झाला ...
निदान पाऱ्याला शोधायच्या निमित्ताने माझा दाढीच्या ब्रशपर्यंत असणारा आणि तिचा सोपस्कारी टिकलीपर्यंत पोचणारा हात एकमेकांना स्पर्श करते झाले आरसा नेमका त्याक्षणी बोलका झाला आणि पारा केराच्या कोपरयात केरसुणीपाशी जाऊन थबकला आरश्याची चौकट म्हणजे ती फ्रेम हो !
नव्यानं बनवून घ्यायला हवी ती फ्रेम...
भिंतीत रुतलेल्या खिळ्य़ाचं आणि आमचं नसेल सख्य फारसं तरीही आठवडयातून तीनदा धुवायला घेतो अश्या रुमलाचं आणि पाण्याचं जाम सख्य आहे ...
हल्ली पारा घरभर हुंदडत असतो त्याच्या मर्जीनं आरश्याचा नुकताच मी चष्मा बनवून घेतलाय भिंतीचं काय हो !
नव्या मुलाम्यासोबत नवा रंग मिरवतेय षटकोनी घरातली प्रत्येक भिंत
षटकोनी खोलीच्या आठी भिंती आपापले रंग मिरवताना दिसतात फक्त एकमेकांना भेटणारया कोनांवर आरशी रंग न चुकता सारखे असतात, भासतात ...
फक्त एकच नियम असतो बरं कां !!! ज्यानं त्यानं आपापला दिसणारा आणि न दिसणारा चष्मा काढून मगच हा कोपरा न्याहाळायचा ...
मग आपापल्या घरातल्या अनिश्चित अश्या कोपरयांसाठी मनात भरभरुन न्यायचा हवा तितका रंग ...
अर्थात ज्याचं जितकं मन मोठं तितका रंग नेण्याची शक्यता अधिक ...
© प्र...साद जोशी

No comments:
Post a Comment