चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Monday, February 3, 2014

शायद जिंदगी जीना इसीका नाम है ।

ज्या ज्या व्यक्तींवर आपण जीवापाड प्रेम करतो
किंवा
जे जे कुणी आपल्यावर जीवापाड प्रेम करतं
या दोन्ही स्थितीत एक भावना अत्यंत स्पष्ट असते ती म्हणजे निरपेक्षता !!!
आता या सगळ्यात काहीही किंवा काहीच अपेक्षा नसतातच असं नाहीये खरं तर पण एक नक्की की त्या सर्व क्षणांचा दरवळ सोबत बाळगूनच जगत असतो आपण किम्बहुना मी एखाद धाडसी पाऊल पुढं टाकून म्हणेन की त्या दरवळाच्या जोरावर खूप नको नको ते सहन करु शकतो आपण ...
कारण आपण एकमेकांवर उधळलेला हरेक, प्रत्येक आणि एकेक क्षण सुरेख आणि सुरेल असतो आणि तो तसाच राहतो आयुष्यभर...
असे अगणित क्षण सोबतीला असताना नेमकेपणानं आपण लक्षात काय ठेवतो ?
आपल्याकडून कळत नकळत घडलेल्या चुकांची बेरीज ?
कधीमधी वजाबाकी देखील
खरंच असे नुसते स्मरले तरी सुखावह वाटणारे  अनेक क्षण गणतीच्या पलीकडे असताना ते एक विचित्र क्षणी उचलेललं चुकीचं पाऊल
किंवा नको त्यावेळी नको तिथं आणि नको तेव्हा टाळ्याला लागलेली जीभ अन् त्यातून उच्चारला गेलेला शब्द ?
हे आणि हेच कां ध्यानात ठेवतो आपण ???
नेमका चुकलेला सूर
नेमकी चुकलेली तान
नेमका
नेमका
आणि
नेमका
एक खवट दाणा येण्याच्या भीतीनं शेंगदाणे खाणं सोडतो कां आपण ?
भूतकाळात बाळाला चालवायचं गणित हुकवलं असतं तर आज धावत्या ट्रेनपासून ट्रैकपर्यन्त कुणी, कुणीच धावू शकला नसता दोस्तहो !
आजच्या दिवशी नथुरामचे गुणगान किंवा गांधीजींची भलावण
इतकंच भूतकालीन ज्ञान ?
वार्षिक दोनवेळा आंबेडकर ?
दारुच्या आठवणीपुरते किरिस्तावांचे सण ?
दोनतीनदा ईद आणि अजुन एखादं मुहर्रम किंवा उरुस आणि त्याच्या सोबतीचे ताबूत आणि त्याच संगतीत स्वतःला आणि शिमग्याच्या देवांना वाहणारे पालखीचे भोई
बास ???
पुरतील नां ?
हा प्रश्नच मुळी आता रद्द केला पाहीजे हो !
कारण पुरते उमगले असे फार कमी क्षण जिन्दगीत येतात
येतातच फक्त कारण आपण त्यांच्यासोबत राहायला कबूलच नसतो
बघा नां !!!
गांधी नोटांपुरते
आंबेडकर कोटापुरते
शाहू आणि शिवबा फोटोपुरते
आपल्यापुरतं नक्कीच बघावं यार सव्वालच नाही पण
नेमकं त्या त्या वेळेचं फायद्याचं गणित बेभरोशी असतं हो
आजही आपल्यापैकी अनेकांच्या घरची सकाळ रेडिओच्या आवाजानं होत नसेलही पण खिडकी उघडी टाकुन बघा कधीतरी
कुठुनसं
" जाऊ देवाचिया गावा
घेऊ तेथेचि विसावा "
असं काहीतरी किंवा भले सकाळ सरत आलेली असतानाही होनाजी बाळाचं " उठा उठा सकळीक "
कानावर आलं नां तर सॉलिड मस्त वाटतं...
करुन तर बघा कधी
आलेले वाईट अनुभव
घडलेल्या अत्यंत विदारक घटना
या आपल्याला पुसता येत नाहीत हे मान्यच पण याचा अर्थ त्याच उराशी ठेवून काहीही साध्य होणार नाहीये यार !
मला दहावीच्या मार्कांवर ब्राह्मण म्हणून मिळालेली ओपन वागणूक आणि माझ्या दोस्ताला मिळालेली स्पेशल कोटा सीट यातली तफावत तो किंवा मी कधीच भरुन काढू शकणार नाही पण आज दोघे आपपल्या ठिकाणी यशस्वी आहोत हे आणि आमची मैत्री तशीच आहे हे जास्त महत्वाचे वाटते आणि तसेच आहे
गोडसे ब्राह्मण होते म्हणून समस्त ब्राह्मण समाजावर खुन्नस बाळगणारे आजही आहेत राहतील
पण त्यानं हाती काय लागतं हे कुणीच सांगू शकलं नाहीये आणि सांगू शकणारही नाही...
कुणाचीच पुण्याई किंवा कधीच्या काळातला दोष जर आज वागवायचा ठरवलं तर पुढं कधी जायचं ?
सख्ख्या नातेवाईकांचा फोटो टांगल्यावर किंवा विधि वगैरे असल्यास ते झाल्यावर शोक संपवून आयुष्य पुढं न्यावंच लागतं आणि त्याला पर्याय नाही
चांगल्यावाईट घटनांच्या वेळेस त्याची याद येणंही स्वाभाविक आहे पण म्हणून रोजचं जीणं बंद करुन चालत नाही
आज कुछ तूफानी करते है म्हणून तूफ़ानी घडत नाही तूफ़ान आधी मनात घोंघावतं मग कृतीत येतं
असंच सुन्न होणं नशीबी आहे म्हणून बसलो तर हाती
" तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाऊसही " असंच वाटणार आणि
सुन्न असण्यातली खिन्नता झटकली की मग मन म्हणतं
" पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते , पावसासकट आवडावी ती म्हणून तीही झगडते "
म्हणून म्हणतो यारो !
साँसे ज़रूरी है ह़ी बिलकूल ज़रूरी है ।
गिनना हैं तो जीया हुए हर लम्हें को गिनो ज़िन्दगी बेशक खूबसूरत होगी ।
हर मुर्देको तो उसका कफ़न ओढ़ने के लिये सिर्फ़ तुम्हारी ही जरुरत होगी ।।
शायद जिंदगी जीना इसीका नाम है ।
© प्र...साद

No comments:

Post a Comment