प्रत्येक गोष्ट काळी किंवा पांढरी असते किंवा असावी असं वाटतं तरी कारण हे जे काही ग्रे असतं असं म्हणतात त्याला ठाम अशी बाजूच नसते ...
अर्थात हे इतकं वैयक्तिक म्हणा नाहीतर एकांगी म्हणा पण मला स्वताला हे असंच असतं असं खात्रीनं वाटतं !!!
मोदीचं राजकारण धर्मांध आहे
केजरीवाल मुर्खशिरोमणी आहे
मनमोहन सिंग अबोल बाहुला आहे
या आणि याच धर्तीवर
राज - उद्धव
आबा - बाबा
काका - पुतण्या
पासून
करुणानिधी - स्टालिन
किंवा
फ़ारुख - उमर अब्दुल्ला
या सर्वांच्या बाबत आपलं मत तसंच
काहीही फरक न करता आपण फक्त दूषणं देत रोजचं आयुष्य ढकलत असतो
एकट्या दुकट्या चोराला पकडायचे सोडाच पण वाट वाकडी करुन ते जे काही घडलंच नाही आणि घडलं असल्यास बघितलं नाही अश्या वृत्तीचा अखंड पुरस्कार करणारे आपण
काही तारतम्य असेल किंवा नसेल पण
घराच्या परसावात संडास बांधा सांगायला विद्या चालते
एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट
बोलणारी विद्या आवडते
मग एखाद्या अगम्य निकषानी पद्म पुरस्कार मिळाला ह्याचा पोटशूळ कां ?
लहान रेघेच्या बाजूला मोठी रेघ आखायची कुवत असेल कां नसेल हे नंतर बघू पण मोठी रेघ बनू शकेल याचा विचार करायची सिध्दता बाळगत नाही हेही लक्ष न देता बाजूला टाकायची म्हटलं तरी ...
अनेक कैनवास आहेत आणि अनेक भिंती आहेत
आपण आपली 'स्व' ची अशी एक रेघ मारुन बघायचा विचार तरी आणतो कां कधी मनात???
जर आपल्याच बिल्डिंगच्या कुठल्याश्या संडास / बाथरुमच्या खिडकीतून आलेल्या स्यानिटरी न्यापकिनचे हिरव्या / लाल कागदांच्या विरुद्ध बोलायला एखाद दोन जिने चढून जाण्याचे धाडस न करणारे आपण सर्व ...
फक्त विद्या बालन किंवा सैफशी आपलं वाकडं होण्याचा संभव नाही म्हणून अकलेचे (???) तारे तोडत असतो आणि दाभोल(ळ)करांना यांच्या सोबत मिळालं म्हणून खोटी आसवं पण ढाळत सुट्टी सार्थकी लावतो
सबंध जगात फक्त आणि फक्त अन्याय होतो आहे याचा डंका मारत फिरणारे आपण आज सोसायटीच्या साध्या जनरल बॉडी मीटिंगला जाणं कुणाच्या लग्नाच्या कितव्याश्या गोष्टीतल्या रेशीमगाठी उलगडत बघत बसतो की सून कुणाच्या घरची होणार ते ...
समाज , आपापल्या शहरातील रस्ते आणि त्याकडे होणारी अनास्था याकडे घसा खरवडून बोलतो पण आज बिल्डिंगमधली कॉमन दिवा गेल्यावर घरातला आणून लावायचं सोडाच पण स्वतः पदाधिकारयाच्या घरी जाऊन सांगायचं सोडून कधीमधि दिसणार्या रखवालदाराची वाट बघतो
आणि लवकर बदला असं पण डाफरतो ...