चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Sunday, June 16, 2019

फादर्स डे

त्याच्या वार्डबाहेरच्या येरझाऱ्या वाढत असताना डॉक्टर बाहेर येतात आणि सांगतात की तिच्या पोटातलं amniotic fluid ड्रेन होणं थांबतच नाहीये आणि स्टिचचा उपयोग होणार नाहीये...

So

फारसं काही नाही
तिला काही होणार नाही यासाठी तात्काळ निर्णय घेतला जातो.

आणि काही वेळानं डाॅक्टर बाहेर येतात, सांगतात की ती व्यवस्थित आहे.

दोनेक मिनिटांनी नर्स याच्या हातात एक गाठोडं देऊन म्हणते की आम्ही फाॅर्मॅलिटीज पूर्ण केल्या आहेत, तुम्ही फक्त रजिस्टरवर सही करुन पुढचं करुन घ्या.

तो सुन्नपणे निघतो इतक्यात नर्स पुन्हा जवळ येते आणि म्हणते की लवकर या because आत्ता तुम्ही तुमच्या मिसेसच्या जवळ असणं गरजेचं आहे.... Hope you understand

होय ... He has to understand everything at that point of time...

त्याला understand करायला सोबत कुणी असो किंवा नसो; He has to understand.

सहा ते सात महिन्याचं वादळ दोन अडीच फूटाच्या खड्डयात गाडलं जातं.
तिथून निघताना तो पटकन एक रोप लावतो त्या खड्डयावर...

त्यानंतर ते दोघेही तिकडून येणं जाणं टाळतात जमेल तसं पण कधी जावं लागलंच तिथून तर ती आत डोकावून बघते त्याच्या नकळत आणि तो वाढणारं पारिजातकाचं रोप बघतो समाधानानं...

फार काही नाही हो
कागदोपत्री ती आई आणि हा बाबा होतच नाहीत.

बस...
बाकी काही नाही.
खरंच बाकी काही नाही...

या घटनेच्या आधीपासूनच मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी mother's day असतो आणि जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी father's day...

बाकी काही नाही...
©Prasad Ramakant Joshi

No comments:

Post a Comment