चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Saturday, May 10, 2014

एक आई

एक आई
माझं बोट धर
एक आई
शेवटची घरघर

एक आई
काळजात
एक आई
काजळात

एक आई
अव्यक्त
एक आई
स्त्री मुक्त

एक आई
ध चा मा
एक आई
मुलामा

एक आई
खिडकीत
एक आई
चौकटीत

एक आई
बोटाशी
एक आई
कां अशी

एक आई
संवेदना
एक आई
वेदना

एक आई
आईपण
एक आई
बाईपण

एक आई
बंद दार
एक आई
फक्त कुलुप

एक आई
सर्वांचीच
एक आई
कुणाची

एक आई
सिंधूताई
एक आई
आनंदीबाई

एक आई
माझी तुझी
एक आई
कुठंच नाही

प्र...साद
१२.०१.२०१३ 

No comments:

Post a Comment