चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Wednesday, September 23, 2009

काही असंच

मी सांधा , तू रंधा
मी हाक , तू धाक

प्र....साद जोशी
पुणे
२३.०९.२००९

Monday, September 21, 2009

नेमकी त्याचवेळी ही अशी कां वागते ?

त्या वेळेचे गणित मला कधी कळत नाही,
नेमकी त्याचवेळी ही अशी कां वागते ?

गरज म्हणावी तर तिलाही असते
आवड म्हणावी तर मलाही असते
आम्हा दोघांची सांगड़ काही बसत नाही
नेमकी त्याचवेळी ही अशी कां वागते ?

मी समुद्र म्हणालो की तिला भेळ आठवते
मी रेतीचे घर म्हणालो की तिच्या डोळ्यात पाणी दाटते
वागावे तरी नक्की कसे मला काही कळत नाही
नेमकी त्याचवेळी ही अशी कां वागते ?

आज राख राख होवुनही तिचेच स्वप्न मनात असते
तिचं तिकडं येणे होतही असावे, मला कधी कळत नाही
सर्व काही संपल्यावर, ती म्हणते की तुझ्याखेरिज एक क्षण जात नाही
मला मात्र कधीच कळत नाही, नेमकी त्याचवेळी ही अशी कां वागते ?

प्र....साद जोशी
पुणे
२२.०९.२००९

Thursday, September 3, 2009

आज उपकारांवर उपकार करून आलो

आज उपकारांवर उपकार करून आलो
मी माझे सर्वस्व दान करून आलो
कुणी मानती पैसा सर्वस्व,कुणी मानती मान सर्वस्व
तसेच आलो उपकार करून

मानाचेही दान दिले अन् पैसेही दान केले
उपकार मात्र तसेच ठेवून आलो
जणू ठेवावे गुप्त धन जपून
तसेच आलो उपकार करून

जाण असावी वा जाण नसावी
कर्त्तव्य माझे मी करून आलो
नकळत वळलो अंधारातून
तसेच आलो उपकार करून !!!

प्र......साद जोशी
पुणे
०३.०९.२००९