!! तोच क्षण असतो जगण्याचा !!
आज चंद्र उगवताना पाहिला मी
आज सूर्यास्त होताना गहिवरून आले होते
कालचे पान आजवर उलटताना थांबलो मी
आजमध्ये कालची शिल्लक पुढे ओढताना बरे वाटले होते
कशाला लावलेत ते गेलेल्याचे फोटो घरभर ?
आज त्याची वाक्ये आठवल्यावर चंदन दरवळला होता
मी माझाच आहे की नाही हा प्रश्न जेव्हा पडला मला
दोस्ता कालच्या मैफिलीत हवा होतास तू असे जाणवले नव्हते
नदीच्या या काठावरून जाताना पैलतीर इकडचा दूर
आज या काठावरून तू तिकडचा खूप दूर असा कधीच नाही वाटलास
मित्रा !
मी जिथे आहे तिथेच तू आणि तोच नेमका क्षण जगण्याचा माझ्या
आणि तुझ्याही
तू आहेस याची शंकाच नाही
पण मी देखील आहे इथे हा विश्वासच खूप मोलाचा अन् महत्वाचा होता
© Prasaad Ramakant Joshi